Tiranga Times Maharastra
त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, आगामी ‘दृश्यम 3’ संदर्भातील चर्चा अचानक तापल्या आहेत. या चित्रपटासाठी अक्षय खन्नाने अपेक्षेपेक्षा वेगळी आणि मोठी फी मागितल्याने बोलणी फिस्कटल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘दृश्यम 3’साठी अक्षय खन्नाने 10-20 कोटींपेक्षा जास्त मानधनाची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. निर्माते आणि अभिनेत्यामध्ये फीवर एकमत न झाल्यामुळे तो चित्रपटातून बाहेर पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशामध्ये अक्षय खन्नाच्या भूमिकेचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. त्याचा लूक, अभिनय आणि स्क्रीन प्रेझेन्स प्रेक्षकांना भावला असून, त्यामुळेच त्याच्या मानधनात वाढ झाल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर, अक्षय खन्ना खरोखरच ‘दृश्यम 3’मध्ये दिसणार नाही का, की पुन्हा नव्याने बोलणी सुरू होतील, याकडे सिनेविश्वाचे लक्ष लागले आहे.
Tiranga Times Maharastra | ‘धुरंधर’नंतर अक्षय खन्नाची फी चर्चेत, ‘दृश्यम 3’बाबत संभ्रम
